हेअर 'रिमूव्हल'बद्दल...
केस सौंदर्याचं प्रतीक मानले जातात. अनेक बायकांसाठी कंबरेपर्यंत लांब व घनदाट केस असणं हे
एक स्वप्न आहे व पुरुषांसाठी केस टिकवणे हे स्वप्न असतं. पण हेच जर केस बायकांमध्ये चेह-यावर
दिसायला लागले तर? तर मात्र त्या बाईची व तिच्या घरच्यांचीसुद्धा धांदल उडते. केस
सौंदर्याचे प्रतीक जरी असले तरीही चेह-यावरचे केस कोणत्याही स्त्रीला नावडणारेच.
चेह-यावर केस फक्त पुरुषांना असतात अशी एक सामान्य समजूत आहे. परंतु चेह-यावर केस हे
स्त्रियांमध्ये सुद्धा आढळतात. फक्त काही स्त्रियांमध्ये ते बारीक असतात व काही स्त्रियांमध्ये
ते जाड असू शकतात. लहान मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांमध्ये चेह-यावर बारीक केस
असतात ज्यांना आपण लव (वेलस हेअर) म्हणतो. मुलगा व मुलगी जेव्हा वयात येतात तेव्हा या
केसांवर संप्रेरकांचा (hormones) प्रभाव पडतो.
मुलांमध्ये ते दाट व राठ होतात. मुलींमध्ये या केसांच्या पोत मध्ये फार फरक पडत नाही .
इथेही मोठ्या प्रमाणात जनुकं ठरवतात की केसांचा पोत कसा असेल. अनेक मुलींना अनुवंशिकतेमुळे
चेह-यावरचे केस नेहमीपेक्षा जाड असू शकतात. काही मुलींमध्ये विविध आजारांमुळे सुद्धा
चेह-यावरचे केस जाड होऊ शकतात.
स्त्रियांमध्ये, हार्मोन्सच्या प्रभावाखाली, चेह-यावरील अनावश्यक केस वाढीला हिर्सूटीसम
(hirsutism) असं म्हणतात. हिर्सूटीसमची अनेक करणं आहेत, उदाः Polycystic ovarian
syndrome/PCOS (पॉलीसीसटिक ओवेरीअन सिंड्रोम), Cushings syndrome (कुशिंग
सिंड्रोम), Adrenal gland tumors(अड्रेनल ट्युमर) , गर्भावस्थेत ई. जेव्हा या केस
वाढीला हार्मोन्स कारणीभूत नसतात तेव्हा या अवस्थेला आपण Hypertrichosis असं म्हणतो.
Hypertrichosis सहसा औषधांमुळे होतो. उदाः Phenytoin, Androgens, Cylcosporine
ई. असे हे अनावश्यक केस काढायचे कसे? उपचार दोन प्रकारचे किंवा गटात विभागलेले आहेत.
1. Medical Therapy/ मेडिकल थेरपी – यात अनावश्यक केस वाढीचं निदान करून
त्वचारोगतज्ञाच्या सल्ल्यानुसार उपचार घेतला जातो. त्वचारोगतज्ञ ठरवतात की पोटातून
गोळ्या द्यायचे किंवा लावायला मलम द्यायचे. PCOS च्या त्रासामुळे केस वाढले असतील तर
स्त्रीरोगतज्ञाचासुद्धा सल्ला घ्यावा लागतो. अनेकदा फक्त गोळ्यांनी सुद्धा केसांच्या वाढीत
किंवा पोत मध्ये फरक पडू शकतो. पण अर्थात, कोणता आजार झाला आहे व प्रत्येक व्यक्तीच्या
शरीरानुसार ठरतं की उपचार किती उपयोगाचा पडेल ते. त्याउपर हा उपचार अनेक दिवस
घ्यावा लागू शकतो.
2. Non-medical Therapy/ नॉन मेडिकल थेरपी-
a. Temporary/ तात्पुरती – यात थ्रेडिंग, waxing, ब्लीचिंग इ. पर्याय वापरून वेळच्या
वेळी अनावश्यक केस काढता येतात. केसांच्या जीवनचक्रानुसार केसांची वाढ होत राहते म्हणून
या उपचारांचा वापर सातत्याने करावा लागतो. सर्वसाधारण दर महिना ते दीड महिन्यात
तरी एकदा उपचार घ्यावा लागतो.
b. Permanent Hair Removal/ पर्मनंट हेअर रीमूव्हल- यात laser/ लेसरच्या किरणांचा
वापर करून केसांच्या बिजकोशाला इजा पोचवण्यात येते. हे कसं होतं? लेसरची किरणं
बिजकोशातील melanin (मेलानिन) रंगद्रव्याला निशाणा बनवत. अतिशय कटाक्षाने ही
प्रक्रिया होत असल्याने बिजकोशाजवळ असेलेल्या इतर ग्रंथींना अजिबात इजा पोहचत नाही.
फक्त केसाच्या वाढीत परिणाम होताना दिसतो.

No comments:
Post a Comment