Sunday, January 12, 2020

सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

 सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

सावित्रीबाई फुले MARATHI BHASHAN 

3 जानेवारी - सावित्रीबाई फुले जयंती 

सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ – मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय.
चरित्र : –
Savitribai Phule (सावित्रीबाई फुले)सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील . इ.स. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच आईचे प्रेम लाभले नाही. 

Savitribai Phule Information In Marathi

त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

Savitribai Phule Jayanti१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. 
 

Savitribai phule birth anniversary

अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते.

savitribai phule information in Marathiपुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने स्वताचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली .शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. 

महात्मा जोतिबा फुले 
१८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.

सावित्रीबाई फुले - बालिका
बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.


सावित्रीबाई फुले के विचार

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांच्या निधन (इ.स. १८९०) झाला. त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. 

सावित्रीबाई फुले के विचार marathi

आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


सावित्रीबाई फुले के विचार मराठी

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.


सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी 

सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.


सावित्रीबाई फुले जयंती 

महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय  समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची परत होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून ज्योतिबा बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या  होत्या .


सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत  नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी ज्योतीबाशी विचार्मिनय करून यशवंतलाच दत्तकच घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.


सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण

ज्योतिबाबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना तत्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली ज्योतिबाच्याच मानाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ  केला होता. ज्योतीबांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य . 


सावित्रीबाई फुले तस्वीरें

 पण ज्योतीबाच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यमुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच  म्हणजे सावित्रीबाईन पासूनच केला. शेतात करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .


सावित्रीबाई फुले फोटो

१४ जानेवारी १८४८ साली ज्योतीबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बाय्कैनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.


सावित्रीबाई फुले भाषण हिंदी

पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही  केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.


सावित्रीबाई फुले भाषण हिंदी

सावित्रीबाईनी  ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी  ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृतू आला. समजातल्या दिन  : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
भाषण क्र : 3 सावित्रीबाई फुले Marathi Bhashan: 


सावित्रीबाई फुले मराठी भाषण


समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय. स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई यांची आज 177 वी जयंती त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमने....

 


सावित्रीबाई फुले मराठी भाषण तथा निबंध

 अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. 

 

दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.


सावित्रीबाई फुले मराठी भाषण लिहून

शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं. 


सावित्रीबाई फुले मराठी माहिती मराठीत

अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या. 


सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध 

फुले दांम्पत्यांनी त्यानंतर नेटिव्ह फिमेल स्कूल, दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन या संस्‍था स्थापन केल्या. पाहाता-पाहाता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. इतकेच नव्हे तर, शाळेतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना 'प्रोत्साहन भत्ता' तसेच 'आवडेल ते शिक्षण' देण्यावर भर दिला. 19व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली.


सावित्रीबाई फुले माहिती मराठी भाषण

अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रा‍तील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.


सावित्रीबाई फुले यांची जयंती

शैक्षणिक क्षेत्रातल्या मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दांम्पत्याचा समारंभपूर्वक सत्कार केला. याप्रसंगी मेजर कँडी यांनी इंग्रज सरकारचे निवेदन वाचून दाखवून या दाम्पत्याचा देऊन गौरव केला. ज्योतीरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या तत्त्वांचा अंगिकार करुन त्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतित केलं.



⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल '  एवढेच स्थान होते,  स्त्रीला  समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.  पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.


सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी मध्ये 

सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.  सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया  नरकात जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.


सावित्रीबाई फुले यांचे कार्य मराठी निबंध

संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक  छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण  त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखीच वाटत. ही सर्व कृत्य त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे.  एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत  राहणार नाही" अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.


सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी

सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.  दादोबा  पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेकशक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती.  स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली.  आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला. 

सावित्रीबाई फुले विचार मराठी

सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले.  अस्पृश्यांसाठी जोतिबांनी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले.  इ. स. १८९३ साली सत्यशोधक  समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. १० मार्च १८९७ रोजी पुण्यात प्लेगची साथ आली होती. दुर्दैवाने त्यांना प्लेगने घेरले आणि त्यातच या क्रांतिकारक  महिलेने जगाचा निरोप घेतला.

चरित्र
 

सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.


सावित्रीबाई फुले शायरी मराठी


सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.


सावित्रीबाई फुले शायरी मराठी


१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.[२]


(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)


सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.


शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.


जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.


केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.


इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.


सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.




No comments:

Post a Comment