Showing posts with label संडास कडक होणे. Show all posts
Showing posts with label संडास कडक होणे. Show all posts

Monday, March 7, 2016

संडास कडक होणे बद्धकोष्ठ बिकट समस्या

कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे,वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे,अति तिखट सेवन,सतत बैठे काम, मोठया व्यासाची कडक कोरडी विष्ठा/ बध्दकोष्ठ/  डोके व पोट जड राहणे, गॅसेस होणे, छातीवर दडपण येणे, चिडचिडेपणा ही लक्षणे यातही कुंथावे लागणे, शौचाला कडक होणे, गुदभागी वेदना, दाह होणे वगैरे रोज समाधानकारक शौचास न होणे, मल अतिशय कडक असणे व तो बाहेर पडण्याकरिता जोर द्यावा लागणे, दोन-तीन दिवसांतून एखाद्या वेळेसच शौचास होणे

लहान मुलांची कडक संडास   | संडासला खडा होणे उपाय   | संडासला खडा होणे   | बाळाला शी होण्यासाठी उपाय   | पालेभाज्या खाण्याचे फायदे    | संडास कडक का होते   | Sap Hana Vora   | Sandas Saf Honyasathi Upay   | Baddhakoshtata   | Krave Bagels

बद्धकोष्ठ म्हणजे काय?
‘बद्घकोष्ठ’ हा शब्द ऐकला तरी अनेकांना कसेसेच होऊ लागते! प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या ‘बिकट’ समस्येचा अनुभव घेतलेला असतो. आता तर असंतुलित आहार, खाण्याच्या अनियमित किंवा चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप न घेणे या सर्व गोष्टी जीवनशैलीचा भागच बनून गेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा शरीरावर अगदी सर्रास दिसून येणारा Image result for लहान मुलांची कडक संडासएक परिणाम म्हणजे बद्धकोष्ठ.


बद्धकोष्ठाची ठराविक अशी व्याख्या नाही. परंतु रोज समाधानकारक शौचास न होणे, मल अतिशय कडक असणे व तो बाहेर पडण्याकरिता जोर द्यावा लागणे, दोन-तीन दिवसांतून एखाद्या वेळेसच शौचास होणे, या सर्व लक्षणांना बद्धकोष्ठ किंवा मलावष्टंभ असे म्हटले जाते. पोट स्वच्छ न झाल्यामुळे व्यक्तीला सतत अस्वस्थता जाणवते. आतडय़ांमध्ये मळ साठून राहिल्यामुळे गॅसेसही होतात. अशा वेळी खाण्याची इच्छा होत नाही. तसेच संडासला कडक होण्याच्या भीतीने खाणे कमी केले जाते, त्यामुळे कालांतराने अशक्तपणाही येऊ शकतो.
Related image तक्रारींना सुरुवात कशी होते?
बद्धकोष्ठाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पचन नीट न होणे. खरेतर अन्नसेवन केल्यानंतर लगेचच तोंडात त्याच्या पचनाची प्रक्रिया सुरू होत असते. अन्नातील पिष्टमय पदार्थाचे पचन येथे सुरू होते. अन्नाच्या पचनासाठी तोंडात तयार होणाऱ्या लाळेत अन्न नीट मिसळले जाणे आणि त्यासाठी ते चांगले चावून खाल्ले जाणे आवश्यक आहे. अन्न पोटात गेल्यावर त्यातील प्रथिनांचे विघटन होते. स्निग्ध पदार्थाचे म्हणजे तेल, तूपसदृश पदार्थाचे विघटन मात्र लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात होते. अन्नाचे पूर्ण विघटन झाल्याखेरीज अन्नाच्या शोषणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. विघटन आणि शोषण या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या की अन्नाचे पचन योग्य रीतीने झाले, असे आपण म्हणतो. पचनक्रिया बिघडली की अन्नाचे शोषण नीट होत नाही, त्यामुळे अन्नाचा टाकाऊ भाग वेळेवर तयार होत नाही. म्हणजेच मल तयार होऊन पुढे सरकण्याच्या प्रक्रियेस वेळ लागतो. अन्न पोटात फार काळ एकाच ठिकाणी पडून राहिले की त्यात फसफसण्याची प्रक्रिया होऊन वायूची निर्मिती होते. परिणामी पोट सतत गच्च भरल्यासारखे वाटते. ही क्रिया म्हणजे बद्धकोष्ठ. काही वेळा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही बद्धकोष्ठाची समस्या उद्भवू शकते.  

टाळण्यासाठी काय करावे?
व्यायाम
पोटाचे आणि पोटातील अवयवांचे स्नायू बलवान होण्यासाठी काही विशिष्ट व्यायामप्रकार आहेत. योगासनांमधील समोर वाकून करण्याचे काही व्यायाम यात विशेष उपयुक्त ठरतात. कपालभाती आणि दीर्घ श्वसन यांचाही पोटातील स्नायूंवर योग्य तो परिणाम होऊन पचनसंस्था बळकट होण्यास मदत होते. पोटाच्या घेराचे स्नायू शिथिल असल्यास त्यासाठी पोटाचा घेर कमी करण्याचे व्यायाम करावेत. हे स्नायू मलनिस्सारणाच्या प्रक्रियेत आतून दाब निर्माण करण्याचे कार्य करत असल्यामुळे ते बळकट असणे आवश्यक आहे. मात्र हे सर्व व्यायाम प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार तज्ज्ञांकडून शिकून घेणे आवश्यक आहे.
अन्नात तंतुमय पदार्थ असणे महत्त्वाचे
अन्नातील तंतुमय पदार्थ आतडय़ांची गती वाढवतात आणि पचनाअंती तयार होणाऱ्या मलाला पुढे सरकण्यासाठी मदत करतात. हे तंतू मलात मिसळले जाऊन मलाला भरीवपणा देतात. तसेच या तंतूमध्ये पाणी धरून ठेवण्याचे गुणधर्म असल्यामुळे ते मल कडक होऊ देत नाहीत. परिणामी, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. त्यामुळे अन्नात तंतुमय पदार्थ पुरेशा प्रमाणात असणे खूप आवश्यक आहे. 
आहार 
* आहार संतुलित असणे फार महत्त्वाचे आहे. भात, वरण, पोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर हा पूर्वापार चालत आलेला मेन्यू अगदी उत्तम. रोजच्या स्वयंपाकात हे सर्व पदार्थ घेणे शक्य नसले, तर एकदल आणि द्विदल धान्ये एकत्र करून त्यात भाज्या घालून पदार्थ बनवावेत. असे पदार्थ आहारात असतील तरी फायदा होतो.
* भाज्या, कंदमुळे, कोंडायुक्त धान्ये यांचे प्रमाण आहारात भरपूर असावे. यातून तंतुमय पदार्थ मिळतात. 
* कच्च्या कोशिंबिरी किंवा सॅलेडही जेवणात आवर्जून घ्यावे.
* लहान मुलांना भाज्यांचे सूप करून द्यावे.
* रोज एकतरी फळ जरूर खावे. फळांमधून तंतुमय पदार्थ तर मिळतातच, जोडीला ऊर्जा मिळते आणि पोटही भरते. 
* जेवणात ताक प्यावे. आपल्या आतडय़ात असणाऱ्या उपकारक जिवाणूंसाठी ते हितकारक असते.
* जमेल तेव्हा शेंगदाणे, चणे, डाळिंब, चिकू, साजूक तूप, सीताफळ, बीट, पालक, भेंडी, गाजर इत्यादींचा आहारात समावेश करावा.
   बालाजी तांबे लहान मुलांची औषधे  बाळ शी करत नाही
‘आई, पोटात दुखतेय..’ लहान मुले अशा तक्रारी नेहमीच करत असतात. लहान मुलांच्या पोटदुखीच्या समस्येने अनेक पालक त्रस्त असतात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सध्याच्या आधुनिक जीवनपद्धती आणि जंक फूडच्या सेवनामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ही समस्या नीट समजावून घेतली आणि त्या पद्धतीने उपाय केले तर या समस्येतून मार्ग निघू शकेल.
खाण्याच्या वेळा सांभाळल्या नाहीत, बाहेरचे खाल्ले, खाण्याचे प्रमाण बिघडले, झोप झाली नाही, औषधे घेतली.. पोटदुखीने जुलाबापासून बद्धकोष्ठतेपर्यंतचा त्रास होण्यासाठी मोठय़ांना ही कारणे सहज लागू पडतात. मात्र डोळ्यांत तेल घालून सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व काळजी घेऊनही लहानग्यांना पोटाच्या तक्रारी होतात तेव्हा मात्र काही सुचेनासे होते. लहानग्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास त्याला/ तिला रोज शौचाला घेऊन जाणे हा त्यांच्या पालकांसाठी मोठा कार्यक्रम असतो. मुलाला आंजारून गोंजारून, प्रसंगी रागावून, चापटी मारूनही हा कार्यक्रम उरकला जातो. काही घरातल्या आई तर सर्वात जास्त याच कार्यक्रमाला घाबरतात.
सर्व काही व्यवस्थित असूनही नेमकी कुठे गडबड होते तेच घरातील अनेकांना कळत नाही. पाच-सहा वर्षांपर्यंत मुलाचे सर्व जेवण पालकांच्या हातात असते. बाळाला सर्व प्रकारचे पौष्टिक घटक मिळावेत म्हणूनही प्रयत्न केले जातात. मात्र तरीही रोजच्या या त्रासाने पालक कंटाळतात. काही वेळा घरगुती उपाय केले जातात. जेवणातील पदार्थ बदलले जातात. मात्र त्याने फारसा फरक पडत नाही. कारण बद्धकोष्ठतेसाठी केवळ जेवण हे एकमेव कारण नसते. मुलांच्या दिवसभरातील हालचाली, त्यांची मानसिकता, औषधे, झोप हे घटकही परिणामकारक ठरतात.
पालकांसाठी सूचना
* मुलांना शौचास जाण्याची सवय लावणे. (दररोज एकदा)
* दररोज एक वेळ नियमित करून मुलांना शौचास बसविणे.
* शौचास आल्यास न संकोचता ते सांगण्याची सवय मुलांना लावणे.
* मुलांना शौचासाठी जबरदस्ती न करणे
– बद्धकोष्ठतेची कारणे
आहार
* जेवणामध्ये तंतुमय पदार्थ कमी असणे
* जंकफूडमध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात. त्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे. उदा. नूडल्स, बिस्कीट, ब्रेड.
* जास्त प्रमाणात दूध पिणे किंवा दुधात पाणी मिळसून बाळास पाजणे.
* पाणी कमी पिणे
शौचास जाणे टाळणे
* नवीन जागा किंवा शौचालय साफ नसणे
* नवीन शाळा किंवा नर्सरी यांमुळे शौचास जाण्याच्या वेळा चुकणे
* आळशीपणा; ज्यामुळे मुले शौचास दाबून ठेवतात.
* शौचाच्या ठिकाणी जखमा असणे.
* शौचाला जाण्याचा अनुभव त्रासदायक असेल तर मुले ते टाळतात. मोठय़ा आतडय़ामध्ये साठलेल्या
शौचातील पाणी शोषून घेतले गेल्याने ते अधिक कडक होते व त्यानंतरचा अनुभव अधिकच त्रासदायक ठरतो.
असे वारंवार घडल्यावर मुले अधिक घाबरतात.
अन्य कारणे
* घर बदललेले असल्यास किंवा घरात नवीन व्यक्ती किंवा पाहुणे आल्यास मुले शौचास लागल्याचे
सांगत नाहीत.
* नवीन शाळा किंवा नर्सरी असल्यास मुले तिथे शौचास सांगण्याचे संकोचतात.
* कधी कधी मुलांना जबरदस्तीने शौचास बसविले जाते. त्यामुळे शौचास करणे मुलांना शिक्षा वाटू लागते.
आहारातील बदल
* पाणी जास्त पिणे
* तंतुमय पदार्थ जास्त खाणे. उदा. फळे, भाज्या, उसळ, कडधान्य.
* फळांचा रस (ज्यूस) पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे केव्हाही चांगले. सालींसकट फळे खावीत.
* पातळ दूध पिणे
(पाणी मिसळलेले नसावे)
* मैद्याचे पदार्थ कमी खाणे.
उपाय
* कडक शौचास होत असेल किंवा मल अडकला असल्यास एनिमा (ील्लीें) देणे. दोन ते तीन दिवस दररोज एनिमा द्यावा लागतो.
* काही विशेष उपाययोजना करून किंवा औषधे देऊन जुलाब घडवून आणणे.
* डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच उपचार करावेत. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे.
लहान मुलांमधील बद्धकोष्ठता म्हणजे काय?
आठवडय़ातून जर मुले तीनपेक्षा कमी वेळा शौचास जात असतील आणि खालील लक्षणे आढळली तर आपण त्या आजाराला बद्धकोष्ठता असे म्हणतो.
बद्धकोष्ठतेची लक्षणे :
* शौचास कडक होणे.
* शौचाबरोबर रक्त येणे.
* अंतर्वस्त्रावर थोडा थोडासा मल लागून राहणे.
* शौचास होताना दुखणे.
 
 बाळाला शी होण्यासाठी उपाय, लहान मुलांची कडक संडास

बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय


दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.


आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण
 पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व पोटात मैदा, मिठाई, बेसन, इ. पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.
 आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते.
 - बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो.
 - रुक्ष आहाराने (उदा. फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते.
 - उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे.

- कॉफी जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते.

- तंबाखूच्या सेवनानेही बध्दकोष्ठता होते.

- बध्दकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते.
  - पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला मोठया आतडयाचा भरीव घट्ट-कडकपणा जाणवतो.

  लहान मुलांना संडास होत नसेल तर  संडास पातळ होण्यासाठी उपाय  लहान बाळाला शी होत नसेल तर काय करावे



उपचार

 लहान मुलांना खडे होणे

 लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.
 

एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले मळाचे खडे 10-15मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.

पॅराफिनच्या लांबट गोळया मिळतात. वेष्टन काढून ही गोळी गुदद्वारात सारली की थोडया वेळाने विष्ठा सैल होऊन सरकते.

 

लहान मुलांना संडास होत नसेल तर

आयुर्वेद


बध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.
 - मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे चांगले. यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.

संडास पातळ होण्यासाठी उपाय 


- बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी किंवा चहा द्यावा म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.
 

लहान बाळाला शी होत नसेल तर काय करावे 

- सौम्य विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण अर्धा ते दीड चमचा + एक कप गरम पाणी रात्री झोपताना द्यावे. त्रिफळा चूर्ण वारंवार घ्यायची वेळ आल्यास दर वेळेस 4-5 चमचे तेल किंवा तूप या बरोबर घ्यावे.
 

बाळाला शी होत नसेल तर उपाय 

- ज्यांना वारंवार मळाचे खडे होतात त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. फुटाणे, टोस्ट, फरसाण, पापडीशेव, पिठले, डाळमोठ, चिवडा, इत्यादी मूलत: कोरडे असणारे पदार्थ वर्ज्य करावेत. याऐवजी पालेभाज्या, मूग, मटकी, चवळी, इत्यादी चोथा-सालपटयुक्त पदार्थ घेणे चांगले.

बाळाला शी होण्यासाठी उपाय 

- जागरण करणे किंवा उशिरा झोपून उशिरा उठणे, हेही खडे होण्याचे कारण आहे. पहाटे उठून मलविसर्जन करणा-यास हा त्रास सहसा होत नाही.